अशोक आमटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील ग्राम पंचायत सरपंच अशोक आमटे यांना आदर्श सरपंच पुरस्कारने सन्मानित नाशिक येथे कालिदास कलामंदिर येथे झालेल्या सरपंच सेवा संघ कार्यक्रम प्रसंगी आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते पत्नी समवेत पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.सरपंच अशोक आमटे यांनी चितळी येथे ग्राम पंचायत माध्यमातून विविध विकासकामे केली असून काही कामे सुरू आहे.गावचा विकास कसा होईल याकडे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष दिले आहे.ज्योतीताई फाउंडेशन च्या माध्यमातून समाजसेवा गावात सुरू आहे.त्यांची उद्योजक म्हणून समाजात चांगली ओळख आहे.