महाराष्ट्र
407
10
बालकल्याणचा परिविक्षा अधिकारी ३००० हजाराची लाच घेताना पकडला
By Admin
बालकल्याणचा परिविक्षा अधिकारी ३००० हजाराची लाच घेताना पकडला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तक्रारदार यांचे विरुद्ध दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे दून महिला बालकल्याणचा जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश पाटील ३००० हजाराची लाच घेताना पकडला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
जेऊर बायजाबाईचे येथील तक्रारदार यांचे विरुद्ध सन २०२० मधे एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे मारामारीचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने तक्रारदार यांचे विरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल आहेत काय याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकारी यांना दिले होते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांचे विरुद्ध आणखी इतर गुन्हे दाखल नसलेबाबतचा अहवाल न्यायालयात पाठविणे करिता यातील आरोपी महेश अनंतराव पाटील जिल्हा परिविक्षा अधिकारी, ( District Probation Officer) वर्ग - ३, महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,
सर्जेपुरा, अहमदनगर, मूळ राहणार- मंत्रीचंड रेसीडेन्सी, पापाराम नगर, विजापूर रोड, सोलापूर हे ३०००/- ची मागणी करत असले बाबतची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.विभाग अहमदनगर यांचेकडे दिली. त्यांचे तक्रारीचे अनुषंगाने आज रोजी लाच मागणी पडताळणी केली असता वर नमूद आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ३०००/- ची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आज रोजी नगर शहरातील सर्जेपूरा येथील कार्यालयात लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडुन पंचासमक्ष ३००० /- लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदरील कार्यवाही अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक शरद गोर्डे,पोलीस उप अधीक्षक, हरीष खेडकर, पो हवालदार संतोष शिंदे,पोना रमेश चौधरी, विजय गंगुल,पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के.चालक पो ह.हरुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक नाशिक सुनील कडासने,अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,पोलीस उपाधीक्षक सतिश भामरे,यांच्या मार्गदर्शना खाली सापळा कार्यवाही केली आहे.
Tags :

