रूपाली चाकणकरांना जीवे मारण्याची धमकी देणारा 'तो' व्यक्ती अहमदनगर येथील 'या' गावचा ; पोलिसांनी घेतले ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील (ता.
नगर) येथून ताब्यात घेतले आहे.
भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला अटक करून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसा धमकीचा फोन त्यांना कार्यालयात आला होता.
त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान आरोपी हा अहमदनगरचा असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून सदर व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. सहायक निरीक्षक सानप व त्यांच्या पथकाने सदर कारवाई केली.
त्याला अटक करून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले. दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन नंबरवर सोमवारी दुपारी 3 वाजून पन्नास मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता.
त्यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली.
त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली होती. पोलिसांनी त्या अनुधानघाने तपस सुरु केला होता.
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासाअंती सदर व्यक्ती नगर जवळील चिचोंडी पाटील या गावातील असल्याचे समजले. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
याआधीही धमकी : याआधीही दोन वेळा चाकणकर यांना धमकीचा फोन आला होता. एकाने तर चाकणकर यांचे पुण्यातील सिंहगड रोडवरील धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकीही दिली होती.