बिबट्याचा ऊसाच्या शेतात मुक्त संचार;शेतकऱ्यांची मोबाईलमध्ये छायाचित्र काढून घराकडे धाव
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरु झाल्याने शेतकरी भयभीत झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की,तेलकुडगाव शेतकरी भागचंद निवृत्ती काळे हे मंगळवार दि.३० रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांचे देवी वस्ती रोड शिवारातील गट नंबर ३०८ मधील ६ महिने वयाचे ऊस पिकात पाणी बदलण्यासाठी गेले असता ऊस पिकातील चरा जवळ दोन बिबटे बसल्याचे आढळून आले.अचानक दोन बिबट समोर आल्याचे श्री.काळे यांची पाचवर धारण बसली.तरी ही हिम्मत करून त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये तिचे छायाचित्र काढून घराकडे परतले.
याबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता हे बिबट दीड ते दोन वर्षा वयाचे असल्याचे सांगितले.
दोन दिवसा पूर्वी तेलकूडगाव शिवरालगत असलेल्या देडगाव शिवारातील झेबाजी कोकरे यांची शेळी बिबट्याने झाल्याची घटना घडलेली आहे.या दोन बिबट्याचे मुक्त संचाराने पिकाला पाणी देणारे,शेतात काम करणारे शेतकरी भयभीत झाले असून वन खात्याने पिंजरा लावून बिबट्यांच्या वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.