तरुणाने चालत्या गाडीत स्वतःला पेटवून घेतले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर संभाजीनगर महामार्गावरील बाभुळवेढे शिवारात शनि चौथऱ्याजवळ मंगळवारी पहाटे कारमधील चालकाने चालत्या गाडीत स्वत:ला पेटवून घेण्याची घटना घडली आहे. पेटलेल्या कारची अक्षरशः राख झाली आहे.
कारमधील भाजलेल्या व्यक्तीचे नाव लंकेश पराजी चिताळकर (22, राहणार साकेत दहिगाव, ता. नगर) असे आहे. सोमवारी रात्री पासून घरी न सांगता गायब झाल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. नगर संभाजीनगर महामार्गावर बाभूळवेढा जवळपास एका हॉटेल समोर महागड्या गाडीत लंकेशने स्वतः पेटवून घेतले. त्यामुळे गाडीनेही पेट घेतला. घटनास्थळी लोकांनी, पोलिसांनी धाव घेऊन गाडीच्या काचा फोडून लंकेशला बाहेर काढले. रुग्णवाहिकेच्या चालकास भाजलेल्या मुलाने वडिलांचा नंबर देऊन कळण्यास सांगितले. तो सुमारे वीस टक्के भाजल्याने उपचारासाठी मॅक्स केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर पुण्याला पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
नगर संभाजीनगर महामार्गावर कार जळून बेचिराख झाली. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याने घटनेचा उलगडा झाला नाही. मात्र गंभीर भाजलेल्या मुलाच्या वडिलांशी संपर्क साधला गेला आहे, असे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.