शिव छावा संघटनेच्या महिला आघाडीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी सौ.पद्मा टकले यांची निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
शिव छावा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा सौ.संगिताताई मुरकुटे व प्रांतध्यक्ष श्री.किरण पिंगळे यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या महिला अहमदनगर जिल्हा अध्यक्षा सौ. मंगल ताई डोंगरे यांनी शिवछावा संघटनेच्या महिला पाथर्डी तालुकाध्यक्षपदी हत्राळ ग्रामपंचायत सदस्या सौ.पद्मा परमेश्वर टकले यांची निवड केली आहे ,ही संघटना कुठलेही राजकीय धोरण डोळ्यासमोर ठेवून काम करत नसून स्त्रियांवर होणाऱ्या -अत्याचाराच्या विरोधात तसेच समाजातील अठरा पगड जाती जमाती साठी काम करणारी संघटना आहे. हि संघटना समाजसेवा हेच ब्रीद वाक्य घेऊन काम करत आहे .तरी सौ. टकले यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील अनेक अन्याय सहन करणाऱ्या महिलांना त्यानिमित्ताने एक प्रकारचा आधार मिळणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावणार असल्याचे टकले यांनी सांगितले. या संघटनेच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील कुठलेही समाजातील कुठल्याही गावातील महिला वर काही अन्याय झाल्यास कृपया संघटनेशी संपर्क करावा व आपल्यावर होणारा अन्याय सहन करु नका असे त्यांनी सांगितले .संघटनाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.मंगलताई डोगरे याच्या मार्गदर्शना खाली तालुक्यात महिलाची एक मोठी चळवळ उभी करणार आहोत तसेच लवकरच शिव छावा संघटनेची पाथर्डी तालुका कार्यकारणी तयार करु असे टकले म्हणाल्या या संघटनेच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची निवडणूक लढणार नाहीत ,असेही त्यांनी सांगितले,निवडणुकीपासुन हि संघटना लाब राहील ,महिला साठी काम करणारी संघटना सध्या तरी कोणतीही सक्रिय दिसत नाही तरी शिव छावा संघटनेच्या माध्यमातुन पाथर्डी तालुक्यातील हि पोकळी आम्ही भरुन काढु असे सौ.टकले यांनी सागीतले.