महाराष्ट्र
1092
10
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत महत्वाचे अपडेट!
By Admin
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत महत्वाचे अपडेट!
नगर व सोलापूर जिल्ह्यातील 'या' शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार हा सहापदरी महामार्ग, वाचा शेतकऱ्यांची नावे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
Surat-Chennai Greenfield Highway : अहमदनगर (Ahmednagar) व सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) तसेच सामान्य जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा तसेच मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तीन प्रमुख जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या विकासाला पंख देणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेबाबत एक महत्त्वाचं अपडेट हाती आल आहे.
सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे विषयी थोडक्यात.!
हा महामार्ग 1271 किलोमीटर लांबीचा आणि सहापदरी असून 70 मीटर रुंदी या महामार्गाची राहणार आहे मात्र असे असले तरी या महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना शासनाकडून 100 मीटर रुंदीची जमीन संपादित केली जाणार आहे. 1271 किलोमीटर लांब असलेला हा महामार्ग एकूण दोन विभागात विभागलेला आहे. हा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे सुरत ते सोलापूर 564 किलोमीटर आणि सोलापूर ते चेन्नई 707 किलोमीटर लांबीचा राहणार असून सदर महामार्ग हा सहा पदरी आहे.
हा महामार्ग 2025 पर्यंत तयार करून सामान्य जनतेसाठी सुरू करण्याचा मायबाप सरकारच्या मानस आहे. विशेष म्हणजे या महामार्गातील सुरत - नाशिक - अहमदनगर या 290.70 किलोमीटर च्या पहिल्या टप्प्यासाठी DPR देखील तयार करण्यात आला आहे. यामुळे निश्चितच हा महामार्ग 2025 पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला होणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हा सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग मराठवाड्यातील (Marathwada) बीड, उस्मानाबाद तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर नाशिक (Nashik) या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचा तर आहेच मात्र या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या शेती व उद्योगधंद्याला गती मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला देखील पंख जोडले जाणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील 6 तालुक्यातुन जाणार हा महामार्ग.!
मित्रांनो, सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे नाशिक मधून येऊन अहमदनगर मध्ये 98.5 किलोमीटर अंतर कापणार आहे. म्हणजेच नगर जिल्ह्यासाठी देखील हा महामार्ग अतिशय महत्वाचा ठरणार आहे. हा सहा पदरी महामार्ग संगमनेर, राहाता, राहुरी, नगर, कर्जत व जामखेड या 6 तालुक्यातून जाणार आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 49 गावातील अंदाजे 1500 हेक्टर जमिनीचे संपादन होणार असल्याची माहिती सांगितली गेली आहे. तसेच वांबोरी घाटात 30 ते 40 मीटर उंचीचे खांब उभारून हा महामार्ग तयार केला जाणार आहे.
Tags :

