महाराष्ट्र
ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
By Admin
ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
पाथर्डी- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलीटेक्निक महाविद्यालयात प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त श्रीकांत ढाकणे यांनी दिली.
या संस्थेमध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी दि.०२ जून ते ३० जूनपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन, अर्ज भरणे व डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसह अर्ज स्विकृती महाविद्यालयाच्या शासनमान्य अधिकृत एफ.सी सेंटर ( सुविधा केंद्र ) वर केली जात आहे. दि.०३ जुलैरोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाणार आहे. दि.०४ ते ०६ जुलैपर्यंत अर्ज वैध बदल स्विकृत केला जाणार आहे. दि. ७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाणार आहे. तेथून पुढे ऑप्शन फॉर्म भरण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
मौजे राक्षी ता. शेवगाव येथील ३ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत असलेल्या ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग, आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. त्याचप्रमाणे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षासाठी ऑनलाईन शासकीय कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी एफ.सी सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना विविध कोर्सबाबतची इत्यंभूत माहिती दिली जात आहे. १० वीचा निकाल लागलेला नसतांनाही फक्त आपला १० वीचा आसनक्रमांकाद्वारेही विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, त्यामुळे निकाल लागण्याची प्रतिक्षा करण्याचीही आवश्यकता नाही.
त्याचप्रमाणे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया दि. १० जून ते ०८ जुलैपर्यंत सुरू झाली असून तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता १२ वी सायन्स उत्तीर्ण किंवा १० वी नंतर दोन वर्षे कालावधीचा कोणताही आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या थेट द्वितीय वर्षात कोणत्याही शाखेत प्रवेश दिला जात असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त श्रीकांत ढाकणे यांनी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या एका वर्षाचा फायदा होणार आहे.
विशेषतः जे विद्यार्थी डिग्री इंजिनिअरिंगसाठी आवश्यक असणारी 'जेईई' परीक्षा देऊ शकलेले नाही, ते विद्यार्थीही डिप्लोमा द्वितीय वर्षासाठी पात्र आहेत. तसेच जे विद्यार्थी ११वी किंवा डिग्री प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांनीही डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी अॅप्लीकेशन फॉर्म भरल्यास भविष्यात जर त्यांना ११वी किंवा डिग्रीस प्रवेश मिळाला नाही, तर ते थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरून आणि शासकीय कोट्यात प्रवेश घेण्यास पात्र ठरतील.
अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग, उत्कृष्ट निकालाची परंपरा, सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, नावाजलेल्या प्रकाशनांनी युक्त डिजीटल ग्रंथालय, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष सोयी-सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींसाठी स्वतंत्र वस्तीगृह व मेस सुविधा, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व २४ तास इंटरनेट सेवा, शासन निर्णयाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, भव्य क्रीडागण व स्पोर्टस सेंटर, विद्यार्थ्यांसाठी बस सेवा, अखंडीत विजपुरवठा व सुरक्षा यंत्रणा, विद्यार्थ्याचा नियमित प्रगती आलेख थेट पालकांच्या मोबाईलवर यांसारख्या अनेकविध सोयी-सुविधांनी संस्थेने अल्पावधीतच जनमानसात मानाचे स्थान पटकाविले आहे. याचीच दखल घेत संस्थेस थेट ३ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच एमएसबीटीईतर्फ शैक्षणिक अवेक्षणासाठी दरवर्षी 'गुड' असा शेरा देण्यात आला आहे. तरी परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी शासकीय व व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी त्वरित महाविद्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. आर एच. अत्तार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ७७९८७७७९९९, ९८९०२८१६२८, ८४२१९८७७४४, ९२०९१९८०४६, ९६८९३४९२८०, ९५८८४५१२६१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Tags :
111169
10