अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचा मोठा आकडा वाढला पहा आजची आकडेवारी
अहमदनगर- प्रतिनिधी
नगर जिल्ह्यात आज १३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८९९ इतकी झाली आहे.
आज जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८१ आणि अँटीजेन चाचणीत १५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, अकोले ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण १०, राहाता ०२, राहुरी ०१, संगमनेर १३, शेवगाव ०४ आणि इतर जिल्ह ०१अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०१, पारनेर ०५, राहाता ०५, संगमनेर २१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १५ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०२, पाथर्ढी ०१, श्रीगोंदा ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये, मनपा १८, अकोले ०६, जामखेड ०५, कर्जत ०६, कोपरगाव १२, नगर ग्रामीण १३, नेवासा ०२, पारनेर १२, पाथर्डी ०८, राहाता ०९, राहुरी ०४, संगमनेर १३, शेवगाव १०, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:७२७६९
उपचार सुरू असलेले रूग्ण: ८९९
मृत्यू:११२९
एकूण रूग्ण संख्या:७४७९७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)