महाराष्ट्र
वादळामुळे भिंत अंगावर पडून तीन जण ठार, तर दोन जखमी; झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
By Admin
वादळामुळे भिंत अंगावर पडून तीन जण ठार, तर दोन जखमी; झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावामध्ये असणाऱ्या मुंजेवाडी शिवारात वादळी वाऱ्याने भिंत अंगावर पडून तीन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुध वडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. गुरुवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दुधवडे हे कुटुंबासोबत घरात बसले होते. परंतु अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवर जाऊन पडले. या दरम्यान घराची भिंत अंगावर पडल्यामुळे विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय ७५), हौसा बाई भिमाजी दुधवडे (वय ६७), साहील पिना दुधवडे (वय १०) हे जागेवरच ठार झाले. तर वनिता पिना दुधवडे ( वय ८), मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय ७०) हे जखमी झाले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की,मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. तर गुरुवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वारे सुटले होते, त्यानंतर गारांचा पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे दुधवडे हे कुटुंबीयांसोबत घरात बसले होते.
वाऱ्याचा वेग वाढल्याने पत्रे उडाले
प्रशासन घटनस्थळी दाखल
या घटनेची माहिती समजताच महसूल मंडल अधिकारी इराप्पा काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, पोलीस नाईक संतोष खैरे, गणेश लोंढे, प्रशांत आभाळे यांच्यासह मनसेचे किशोर डोके, शिवसेनेचे जनार्दन आहेर, पोलीस पाटील सीताराम आभाळे, सरपंच अरुण वाघ, संतोष देवकर, संपत आभाळे, अशोक वाघ यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पठार भागातून हळहळ
जखमींना सरकारी रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतांना खासगी रुगणवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने पठार भागातून हळहळ व्यक्त होत आहे.
संगमनेर तालुक्यात झालेल्या वादळ आणि पावसामुळे बर्याच प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. या पावसात मृत्यूमुखी पडलेल्यांना तातडीने शासनाची मदत देणार आहे.”
– अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर
– अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर
Tags :
14458
10