अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ; पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे; विखे गटाची दोन जागांवर बोळवण
By Admin
अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ; पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे; विखे गटाची दोन जागांवर बोळवण
अहमदनगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जागा जिंकून आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद...
अहमदनगरः अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जागा जिंकून आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच येण्याची शक्यता आहे. भाजपला दुसर्या क्रमाकांच्य जागा मिळाल्या असल्या आणि बँकेच्या इतिहासात आतापर्यंतच्या त्या सर्वाधिक जागा असल्या, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यांशी जुळवून घेतल्याने त्या मिळाल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
सहकार क्षेत्रातील निवडणुकीत पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काम करायचे असते, हे अहमदनगर जिल्हयाने राज्याला शिकविले आहे. 21 पैकी 17 जागांची निवडणूक बिनविरोध झाली होती. राहिलेल्या चार जागांचे निकाल रविवारी लागले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ, भाजपला सात, काँग्रेसला चार, शिवसेनेला एक जागा मिळाली. जलसंपदामंत्री शंकरराव गडाख यांच्या रुपाने शिवसेना जिल्हा बँकेच्या राजकारणात पहिल्यांदाच आली. असे असले, तरी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक नंतर राष्ट्रवादीत आलेले सबाजी गायकवाड पूर्वी जिल्हा बँकेचे संचालक होते. अण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ हे दोघेच विखे गटाचे जिल्हा बँकेत प्रतिनिधी आहेत. पिसाळ यांचा तर अवघ्या एका मताने विजय झाला. थोरात-पवार यांनी ताकद लावली असती, तर कदाचित तीही जागा जिंकता आली असती. खासदार डॉ. सुजय विखे यांनी रामदास भोसले आणि दत्ता पानसरे यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली; परंतु भोसले यांना मिळालेली अवघी सहा मते आणि पानसरे यांचा मोठ्या मताधिक्याने झालेला पराभव बदलत्या राजकीय समीकरणाची चाहूल आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विखे यांचे वर्षानुवर्षाचे समर्थक असलेले नंदकुमार झावरे यांनी विखे यांच्याविरोधात पवित्रा घेऊन नीलेश लंके यांना
मदत केली. आता त्याच लंके आणि झावरे यांनी एकत्र येऊन उदय शेळके आणि प्रशांत गायकवाड यांच्या विजयाच्या पालख्या उचलल्या. विवेक कोल्हे, मोनिका राजळे, अमोल राळेभात यांच्यासह अन्य तीन जण भाजपचे असले, तरी त्यांनी भाजपेपक्षा थोरात-पवारांशी जुळवून घेतल्याने त्यांचा बँकेत चंचुप्रवेश झाला. शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात नगर-राहुरी तालुक्यातील राजकारणाचेे संदर्भ वेगवेगळे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही कर्डिले यांना विरोध असतो. कर्डिले विरोधावर त्यांचे राजकारण चालू असते. त्यामुळे थोरात-पवार यांनी प्रयत्न करूनही कर्डिले यांना बिनविरोध निवडून आणता आले नाही. अर्थात विधानसभेच्या निवडणुकीत विखे यांनी कर्डिले यांच्याबाबत काय केले, हे कर्डिले यांनीच जाहीर तक्रार करून सांगितले आहे. त्यामुळे त्याबाबत वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
पारनेरला सर्वाधिक संचालक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 21 संचालकांपैकी सर्वाधिक तीन संचालक पारनेरला मिळाले आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद प्रदीर्घ काळापासून पारनेरला मिळाले नाही. उदय शेळके यापूर्वी बँकेचे उपाध्यक्षपद मिळाले होते.