महाराष्ट्र
मुळा धरण तेहतीसव्या वेळी भरण्याची प्रतीक्षा!
By Admin
मुळा धरण तेहतीसव्या वेळी भरण्याची प्रतीक्षा!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मुळा'ची पाणी साठवण क्षमता वाढवावी
नगर जिल्ह्याच्या पाणी व्यवस्थापनाचे अभ्यासक तथा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता वाढविण्याची मागणी अनेकदा शासनाकडे केली आहे. मुळा धरणाचा साठा 2 ते 3 हजार टीएमसीने वाढविल्यास शेती सिंचनासाठी लाभ ठरणार आहे. धरण स्थापन झाल्यानंतर वाढते नागरीकरण व औद्योगिक क्षेत्राचे पाणी आरक्षण वाढत चालले आहे. शेती सिंचनासाठी पाण्याच्या वापरात कपात हे शेती क्षेत्रासाठी चिंतेची बाब असल्याचे माजी खासदार तनपुरे यांनी शासनाला निदर्शनास आणून दिले आहे.
सन 1972 पासून मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पाणी जमा होण्यास प्रारंभ झाला. तेव्हापासून सन 2021 पर्यंत धरण 32 वेळा पूर्ण 26 हजार दलघफू क्षमतेने भरले.
दरम्यान, यंदाही धरणामध्ये आषाढी सरींच्या कृपेने 68.10 टक्के पाणी जमा झालेले आहे. अजूनही मान्सून काळ अधिक असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा वाढलेली आहे. नगर दक्षिणेसाठी तारणहार ठरलेले मुळा धरण भरणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
ज्यावेळी धरण पूर्ण क्षमतेने भरले, त्यावेळी नगर दक्षिणेत पाणी टंचाई भासली नाही. दुष्काळमुक्ती केलेल्या मुळा धरणाने नगर दक्षिणेतील राहुरी, नेवासा, नगर, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील सुमारे 780 हजार 689 हेक्टर शेती क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुळा धरणाचा उजवा कालवा लाभदायी ठरला आहे. तर, उजव्या कालव्याअंतर्गत असलेल्या वांबोरी चारीने जिरायती क्षेत्राचे नंदनवन करीत अनेक गावांमध्ये सुरू असलेले पाण्याचे टँकरला ब्रेक लावण्याचे मोलाचे काम केले आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या राहुरी तालुक्यातील जिरायत क्षेत्रासाठी डावा कालवा लाभदायी ठरला आहे.
डावा कालव्यावर 10 हजार 121 हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. तर उजव्या कालव्याअंतर्गत शेतकर्यांच्या 279 पाणी वापर संस्था, तर डाव्या कालव्यावर 28 पाणी वापर संस्था कार्यान्वित आहेत. डाव्या व उजव्या कालव्याने लाखो हेक्टर क्षेत्राचे नंदनवन केलेल्या मुळा धरणावर नगर दक्षिणेच्या पिण्याच्या पाण्याचे सर्वस्व अवलंबून आहे. धरणावर उभारलेली नगर शहराची पाणी योजना, औद्योगिक क्षेत्राची पाणी योजना यासह 6 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांमुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आलेला आहे.
मुळा धरणाच्या पाण्यावर आधारित असलेल्या गावांना 26 हजार दलघफू पाणी क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणी साठ्यामध्ये 540 दलघफू पाणी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी राखीव आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी 323 दलघफू पाणी, वांबोरी चारी 680 दलघफू, भागडा पाईप चारीसाठी 60 दलघफू, जलाशय उपसा 420 दलघफू, 13 हजार 140 दलघफू पाणी हे शेती सिंचनासाठी राखीव असून, पिण्यासाठी 7 हजार दलघफू पाणी पिण्यासाठी व इतर उद्योगांसाठी आरक्षित आहेत.
धरणाचा मृतसाठा हा 4 हजार 500 दलघफू आहे. उपयुक्त पाणी साठा 21 हजार 500 दलघफू असल्याने नगर दक्षिणेमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाला मुळा धरणाचा मोठा लाभ झालेला आहे. सन 2019 पासून धरण सलग तीन वर्षे पूर्ण क्षमतेने भरत आहेत. त्यामुळे सलग चौथ्या वर्षीही धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा लागलेली आहे. सद्यस्थितीला मुळा धरणाचा पाणीसाठा 17 हजार 889 (69 टक्के) दलघफू इतका नोंदविण्यात आला आहे.
Tags :
537
10