अहमदनगर जिल्हा बँक संचालक मंडळाच्या 17 जागा बिनविरोध
अहमदनगर - प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 17 जागा गुरुवारी बिनविरोध निवडून आल्या आहेत.
आज गुरुवार दि.11 फेब्रुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.अनेकांनी अर्ज मागे घेतल्याने 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरीत 4 जागांसाठी मतदान होणार आहे.
बिनविरोध निवडून आलेले संचालक असे.
सेवा सोसायटी मतदारसंघ
1) अकोले- सिताराम गायकर
2) संगमनेर- माधवराव कानवडे 3)कोपरगाव- विवेक कोल्हे
4)श्रीरामपूर- भानुदास मुरकुटे
5) नेवासा-मंत्री शंकराव गडाख
6) शेवगाव- चंद्रशेखर घुले पाटील 7)राहता-अण्णासाहेब म्हस्के
8) जामखेड-अमोल राळेभात 9)पाथर्डी-आ. मोनिकाताई राजळे 10)श्रीगोंदा-राहुल जगताप
11)राहुरी- अरुण तनपुरे
शेतीपूरक मतदारसंघ
आ.आशुतोष काळे
महिला राखीव
1)अनुराधाताई नागवडे
2) आशाताई तापकीर
भटक्या विमुक्त मतदार संघ
गणपतराव सांगळे
ओबीसी मतदारसंघ
करण ससाणे
अनुसूचित जाती मतदारसंघ
अमित भांगरे
निवडणूक होणारे मतदार संघ
कर्जत , नगर आणि पारनेर सेवा सोसायटी मतदार संघात आणि बिगर शेती मतदारसंघात निवडणूक होणार आहे .