कडबा कुट्टी मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू; 11 महिन्यांची चिमुकली झाली पोरकी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील देवगाव येथे हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जनावरांसाठी कडबाकुट्टी करत असतांना महिलेच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यत्राच्या बेल्ट मध्ये अडकल्याने झालेल्या अपघातात महिला ठार झाली आहे.
सरिता अजिनाथ गवते( वय २५) असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती आजिनाथ व सरिता हे दोघे सकाळी सात वाजेच्या सुमारास जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना नजर चुकीने सरिताच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यंत्राच्या बेल्ट मध्ये अडकला. सरिता हिचे डोके मशीनवर मागच्या बाजूने जोरदार आदळले. डोक्याला मोठी जखम झाली व रक्तस्राव झाला. घटनेनंतर तात्काळ महिलेला नगर येथील रुग्णालयात नेत असताना रुग्णालयाजवळ जात असतांनाच रस्त्यात मृत्यू झाला.
या घटनेने देवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महिलेला तीन वर्षाचा मुलगा तसेच अकरा महिन्याची लहान मुलगी आहे. या लहानग्या कोवळ्या मनांना आपल्या आईच्या घटनेबाबत कुठलीही समज नसल्यामुळे केवळ अंत्यविधीसाठी आलेल्या गर्दीकडे बघून रडत मम्मी मम्मी म्हणत असतांनी अनेकांचे मन हेलावून गेले. देवगाव येथे शोकाकुल वातावरणात सरितावर अंत्यसंस्कार करण्यात आले.