पाथर्डी-'या' ठिकाणी शासकीय कामात अडथळा आणल्याने महिलेवर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शासकीय कामात अडथळा आणला म्हणून एका महिलेवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलीस नाईक निलेश म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, या घटनेतील आरोपी महिला सुनीता संजय भोसले (रा.शेवगाव रोड पाथर्डी) या पोलीस स्टेशनमध्ये आल्या.
त्यांनी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी मला कर्ज देत नसून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे म्हणत पोलीस स्टेशनच्या आवारात गोंधळ घातला व पोलिसांशी अरेरावी केली.
पोलिसांनी या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या महिलेने पोलिसांना शिवीगाळ केल्याने अखेर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा यासंदर्भात दाखल करण्यात आला असून, या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्यराम निरंजन वाघ हे करत आहेत.