महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात डॉ. कृषिराज टकले
By Admin
शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात डॉ. कृषिराज टकले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांनी मागील काळात पुणतांबा येथे शेतकरी संप करुन सरकारला हादरवले होते तरी शासनाने आश्वासन देऊन मागचे आंदोलन दडपवले होते आता शेतकरी आंदोलनातील प्रश्न सोडवा अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल
रासायनिक खतांच्या किमतीत वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ झालेली आहे. कीटकनाशक व बियाण्यांचीही दरवाढ झालेली आहे. याशिवाय डिझेलची दरवाढ झाल्याने टॅक्टरद्वारे मशागतीचाही खर्च वाढला आहे.या सर्वांमुळे उत्पादन खर्च वाढला असल्याने शेती आता करायची की सोडून द्यायची, या मानसिकतेत शेतकरी आलेले आहेत.
शेतकऱ्यांचा माल निघताच बाजारात हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केली जाते. व्यापाऱ्यांच्या षङ्यंत्राचा शेतकरी बळी ठरत असताना शासन-प्रशासन गप्प आहे. कुणावरही कारवाई होत नाही, त्यामुळे शेती हा न परवडणारा धंदा झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.
दरवर्षी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, मजुरीचे दरवाढ होत असल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्या तुलनेत उत्पन्न होत नाही, याशिवाय शेतमालाचा भावही मिळत नाही, त्यामुळे जिरायती शेती न करता सोडून दिलेली बरी, असे वाटायला लागले आहे.डिझेलची दरवाढ झाल्याने टॅक्टरद्वारे शेती मशागतीचा खर्च दुपटीने वाढला आहे. याशिवाय कृषी निविष्ठांच्या किमतीदेखील वाढल्या आहे. मजुरीचे दर वाढले आहे. हंगामात शेतमाल निघाले ही दरवर्षी भाव पाडले जातात. यामुळे उत्पादन खर्चही वाढत असल्याने शेती आता परवडत नाही.
असे मत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषिराज टकले पुणतांबा येथे शेतकरी आंदोलकांची भेट घेवून पाठिंबा दिला आहे.
याप्रसंगी किसान क्रांतीचे डॉ.धनंजय धनवटे ,बाळासाहेब चव्हाण, धनंजय जाधव,सुहास वहाडणे,प्रसिद्धी प्रमुख अमोलराजे म्हस्के ,चंद्रकांत लबडे यावेळी उपस्थित होते.
Tags :
9469
10