महाराष्ट्र
भाजप पदाधिकाऱ्यांचीच यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार
By Admin
भाजप पदाधिकाऱ्यांचीच यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर दक्षिण चे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे राजकारण, वैकासिक कामे, अन जनतेशी असेलली जवळीक सर्वश्रुत आहे. दरम्यान मात्र त्यांच्याविरोधात भाजपमध्येच खदखद असल्याचे समोर आले आहे .
कारण भाजप पदाधिकाऱ्यांनीच खा.
सुजय विखे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या गावात एक रुपयाचा निधी देखील खर्च होत नाही.
तसेच विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला विश्वासात घेतले जात नाही अशी तक्रार भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या समोर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे व तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे यांनी केली आहे. तसेच ते म्हणाले की, यासंबंधी प्रदेश पातळीवर तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही.
यामुळे प्रदेश पातळीवरून आम्हाला ताकद द्यावी अशी मागणी देखील केली. आ. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर येथे भाजप कार्यकर्त्यांसाठी आयोजीत संघटनात्मक बैठकीत हा प्रकार घडला. यावेळी बोलताना विश्वनाथ कोरडे म्हणाले, कुणीतरी आमच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
प्रदेश भाजपाला पारनेर भाजपा विकसीत करायचा का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान त्यांनी असेही म्हटले की, पारनेर तालुक्यात भाजपला ताकद देण्यासाठी प्रदेश पातळीवरूंन प्रयत्न होणे गरजेचे आहे.खासदार निधीतला एकही पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आला नाही.
तसेच मध्यंतरी ज्या केंद्र सरकारच्या रूग्णवाहिका व इतर साहित्य वाटण्यात आले ते संघटनात्मक कार्यात व पक्षाच्या बांधणीसाठी व वाढीसाठी काही काम करत नाही. पारनेर तालुकाध्यक्ष वसंत चेडे म्हणाले की, काही नेते गरज असल्यानंतर आम्ही पक्षाचे आहोत. असे सांगतात मात्र भाजपा कार्यकर्त्यांना दाबण्याचे प्रकार होत आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगले काम करावे लागणार आहे. यासाठी ताकतीची गरज आहे. भाजपमधील अंतर्गत धुसफूस सुरू असुन याला त्यांनी दुजोरा दिला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी भाजप पदाधिकार्यांना सबुरीचा सल्ला देत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देत वेळ मारून नेली.
Tags :
46944
10