धक्कादायक घटना आईचा टोकाचा निर्णय, तीन मुलांसह विहीरीत उडी मारुन संपवलं जीवन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
स्वाती बाळासाहेब ढोकरे (वय २८) असं या आईचं नाव असून, स्वातीने आपल्या दोन मुली भाग्यश्री आणि माधुरी आणि ४ महिन्यांचा मुलगा शिवमला घेऊन आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडगेदरा येथील शेतकरी बाळासाहेब गणपत ढोकरे हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह राहात होते. घराशेजारीच असलेल्या विहिरीत त्याच्या पत्नी स्वाती ढोकरे तीन मुलांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी आढळून आला. या घटनेबद्दल गावात माहिती कळल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने हे चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खांडगेदरा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ मार्चला एका आईने आपल्या तीन मुलांसह विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडालेली असून आईने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबद्दलचं कारण मात्र समजू शकलेलं नाही.
घारगाव पोलिसांनी हे चारही मृतदेह संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घारगाव पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आईला हे टोकाचं पाऊल का उचलावं लागलं याचा तपास सध्या केला जातोय. स्वाती ढोकरे यांनी उचललेल्या पावलामुळे गावावर शोककळा पसरली आहे.