महाराष्ट्र
उत्तम व्यवहारातून जोडलेल्या धनाचा लोभ नसावा- ह.भ.प. रामगिरी महाराज
By Admin
उत्तम व्यवहारातून जोडलेल्या धनाचा लोभ नसावा- ह.भ.प. रामगिरी महाराज
विश्वविनायक लॉन्स चे भव्य उदघाटन
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर शेकटे फाटा येथे विश्वविनायक लॉन्सचे भव्य उदघाटन तसेच विश्वविनायक अर्बन मल्टिपल निधी पाथर्डी या शाखेचा चौथा वर्धापन दिन नुकताच येळेश्वर संस्थान येळीचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी जिल्हा परीषद सदस्या सौ.प्रभावती ढाकणे, सौ.मनिषा ढाकणे, डॉ. शेखर बो-हाड़े, नलिनीताई शहाणे (मानूरकर ), जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव शिरसाट, पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, दि व्यंकटेश मल्टिस्टेटचे संचालक अनिल गुंजाळ, भाजपाचे जिल्हा संघटक अजय रक्ताटे, पंचायत समितीचे गटनेते सुनिल ओव्हळ व सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुसरेचे सरपंच दादापाटील कंठाळी, लॉन्स व निधीचे चेअरमन मोदकजी शहाणे(मानूरकर) , ज्ञानेश्वर माऊली उदागे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,नगरसेवक अनिल बोरुडे,डॉ.अनिरुध्द देशमुख, भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अशोक गोरे, अशोक कांजवणे, चैतन्य अर्बनचे संचालक बंडोबा आंधळे, ब्रम्हनाथ उदयोगसमुहाचे मालक दत्ता केदार, सुरेश बुराडे,स्वप्निल काकडे, तिरुपती बालाजी अर्बनच्या चेअरमन ज्योती शर्मा व विश्वविनायक उदयोग समुहाचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
या वेळी ह.भ.प.रामगरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, उत्तम व्यवहारातून धन जोडावं आणि त्याचा लोभ न बाळगता विचारपूर्वक ते खर्च करावं. जो असं वागेल त्याला उत्तम गती प्राप्त होईल आणि त्याला आयुष्याचा उत्तम उपभोग घेता येईल. जो दुस-यावर नेहेमी उपकार करतो, कोणाचीही निंदा करत नाही, गाई वगैरे पशूंचे पाळण करतो, गरजुंना मदत करतो, तहानलेल्याला पाणी देतो, जो शांतीरूप आहे, कोणाचंही वाईट करत नाही, आपल्या वाडवडिलांचं महत्व,किर्ती वाढवतो, त्याला परम वैराग्याचं फळ मिळतं, असं तुकाराम महाराज अभंगातुन सांगतात. त्याप्रमाणे संसार तर सर्वांनाच करावा लागणार परंतु तो सतत उत्तम गतीस कसा नेता येईल, याचे उदाहरण म्हणजे विश्वविनायक उदयोग समुहाचे मालक मोदक शहाणे (मानूरकर ) यांच्याकडे पाहतांना वाटते. त्यामुळे त्यांच्या उदयोग व्यवसायाला अल्पावधीमध्ये मोठे यश मिळतांना दिसत आहे.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते लॉन परीसरामध्ये १०१ वक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मोदक शहाणे यांनी तर आभार ज्ञानेश्वर माऊली उदागे यांनी मानले.
Tags :
3475
10