त्या` शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीत नगर `नंबर वन` ! पंतप्रधानांच्या हस्ते होणार गाैरव
By Admin
'त्या` शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीत नगर `नंबर वन` ! पंतप्रधानांच्या हस्ते होणार गाैरव
अहमदनगर- प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या हेतुने वार्षिक सहा हजार रूपयांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज दाखल केले व लाभ घेतला, मात्र त्यात अनेक अपात्र शेतकऱ्यांनीही लाभ घेतल्यांने त्यांची वसूली सुरू झाली होती, त्या वसुली अभियानात नगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांकाचे काम केल्याने जिल्हाधिकार डॉ. राजेंद्र भोसले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे ऊद्या (ता. 24 ) गौरव होणार आहे.
जिल्ह्यात सुमारे 10 लाख शेतकरी असून, त्या पैकी सात लाख शेतकऱ्यांनी पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल केले होते.
मात्र यातील अनेक शेतकरी अपात्र होते. असे अपात्र शेतकरी शोधून त्यांच्याकडून सुमारे 10 कोटी रूपये नगर जिल्ह्यात वसूल करण्यात आले आहेत, अशी माहीती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी `सकाळ`शी बोलताना दिली.
जिल्ह्यात सुमारे 30 हजार अपात्र शेतकऱ्यांनी 20 कोटी रूपयांची लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांना शोधून त्यांना विनंती करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याचे मोठे जिकरीचे काम होते, हे काम महसूल, कृषी विभाग तसेच तहसीलदार प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सर्वांनी संयुक्तरित्या अतिशय चांगले केले. सुमारे 10 कोटी रूपये वसूल केले, त्यामुळे राज्यात आपल्या जिल्ह्याचे काम चांगले झाले. या चागल्या कामाचे श्रेय अधिकाऱ्यांसह वसुलीस प्रतिसाद देणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही हे चांगले काम करू शकलो, असेही भोसले म्हणाले.
आठ दिवस पाहू
कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. आणखी आठ दिवस वाट पाहू. अऩ्यथा वेगळे निर्णय घ्यावे लागतील. सध्या संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी घ्यावी. कामाशिवय घराबाहेर पडू नेये. मागील आठवड्यात 10 टक्के असणारा कोरोना आता 12 टक्के झाला आहे. सभा समारंभ लग्नविधीव धार्मि विधी यावर पूर्वीप्रमाणे उपस्थितीची बंधणे लावण्यात आली आहेत. ती जनतेने पाळावीत, असे आवाहन भोसले यांनी केले.