महाराष्ट्र
महिलांची पर्स चोरणारी टोळी गजाआड, अडीच लाखांचे सोने हस्तगत
By Admin
महिलांची पर्स चोरणारी टोळी गजाआड, अडीच लाखांचे सोने हस्तगत
पाथर्डी तालुक्यातील 'या' आरोपींना अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बसमध्ये चढणार्या महिलांच्या पर्समधील दागिने चोरणार्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सोनाली विजय काळे, काजल विजय काळे, कार्तिका शर्मा चव्हाण व लखन विजय काळे (रा. पाथर्डी रस्ता, शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीने दि. 5 ऑगस्ट रोजी लोणी व्यंकनाथ येथील अर्चना खलाटे या मिरजगाव येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी बसमधून जात असताना त्यांच्या पर्समधील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. श्रीगोंदा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. जवळपास वीस ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र आरोपी निष्पन्न होत नव्हते.
संशयित आरोपी शेवगाव भागातील असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली. पथकाने त्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत तीन महिलांना ताब्यात घेतले. पळून जात असलेल्या लखन काळे याला पाठलाग करून ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली व चोरीतील मुद्देमालही काढून दिला. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, प्रकाश मांडगे, रवींद्र जाधव, प्रशांत राठोड, नितीन शिंदे, महिला पोलिस छाया म्हस्के, लता पुराणे यांच्या पथकाने केली.
पोलिसांकडून दोन दिवस रेकी
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरी करणार्या महिला असल्याचे स्पष्ट झाले होते. चोरी केल्यानंतर त्या ढोकराई फाटा येथून शेवगाव येथे गेल्या. त्या महिला ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्या ठिकाणी जाऊन पथकाने दोन दिवस रेकी केली. चोरी करणार्या संशयितांची खात्री पटल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
Tags :
7308
10