स्वर्ग रथ या गाडीचा लोकाअर्पण सोहळा संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील स्वर्गीय मा. आ. राजीव आप्पासाहेब राजळे यांचे स्मरणार्थ कासार पिंपळगाव येथील श्री.वृद्धेश्वर अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी ली चे अध्यक्ष यांनी श्री वृद्धेश्वर बहुउद्धेशीय फाऊंडेशन कासार पिंपळगाव या संस्थे मार्फत स्वर्ग-रथ या गाडीचे लोकाअर्पण सोहळा ह.भ.प. भाऊ पाटील राजळे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी संभाजी नाना राजळे , भाऊसाहेब राजळे, कल्याण भगत ,नामदेव राजळे, विलास भगत, गणेश शेरकर, राधाकीसन राजळे , महादेव राजळे, तुषार तुपे , ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब राजळे, संभाजी राजळे, संतोष शेळके, अण्णासाहेब शिरसाठ तसेच सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी ,श्री वृद्धेश्वर अर्बन पतसंस्थाचे कर्मचारी यांचे उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.