उद्धव ठाकरे सत्शील मुख्यमंत्री : यशवंतराव गडाख
अहमदनगर- प्रतिनिधी
शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासारखे एक सत्शील व सरळमार्गी व्यक्तीमत्त्व असणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, हे आपले भाग्यच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.
जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, तसेच ज्ञानेश्वर व मुळा कारखान्यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा गिडेगाव येथे गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
"ज्ञानेश्वर'चे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, "मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, ऍड.
देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, बबन भुसारी, काशिनाथ नवले, सभापती रावसाहेब कांगुणे आदी उपस्थित होते.
मंत्री गडाख म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सरळ, साधे मुख्यमंत्री लाभले. पदग्रहण करताच त्यांनी सरसकट कर्जमाफीचा पहिला निर्णय घेतला. यापूर्वी निवडणूका जवळ आल्यावर कर्जमाफीच्या घोषणा होत. मात्र, निवडणूक झाल्यावर झालेली ही पहिली कर्जमाफी आहे. जिल्हा बॅंकेचा मागील पाच वर्षांचा कार्यकाल बघता, त्यावर न बोललेलेच बरे! बॅंकेत अनेक गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे.''
प्रास्ताविक सरपंच भगवान कर्डिले यांनी केले. नानासाहेब रेपाळे, नानासाहेब फाटके, भैयासाहेब देशमुख, शिवाजी कोलते, बापूसाहेब शेटे, दादासाहेब गंडाळ, प्रभाकर कोलते, नारायण लोखंडे, शिवाजी शिंदे, असिफ पठाण आदी उपस्थित होते.