महाराष्ट्र
करंजीत उसतोडणी मजुराचा खून
By Admin
करंजीत उसतोडणी मजुराचा खून
पाथर्डी- प्रतिनिधी
ऊस तोडणीच्या कामास जाण्यास उशिर झाल्याच्या कारणावरून मुकादमाने केलेल्या मारहाणीत एका ऊस तोडणी कामगाराचा मृत्यु झाला असून मयताचे प्रेत करंजी घाटात आणुन टाकल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
समजलेल्या माहिती वरून राहुरी तालुक्यातील खडांबे येथील संजय काशिनाथ माळी (४५ वर्ष) याने व गावातील काही मजुरांनी ऊस तोडणी कामासाठी कारखान्याच्या मुकादमाकडुन (मुकादमाचे नाव समजले नाही) उचल घेतली होती. परंतु काही कारणामुळे या मजुरांना कामावर जाण्यास उशिर झाल्याने मुकादमाने या मजुरांना त्यांच्या गावी जावुन स्वतःच्या वाहनाने त्यांना त्यांच्या गावाकडुन आणुन करंजी घाटाच्यावर आष्टी तालुक्यातील मराठवाडी-हारेवाडी येथे एका खोलीत ३-४ दिवस कोंडून ठेवल्याचे समजते. त्यानंतर या मुकादमाने व त्यांच्या साथीदारांनी रोज उपाशी ठेवुन मजुरांना अमानुष मारहाण केली. या जबर मारहाणीत खडांबे ता. राहुरी येथील
संजय काशिनाथ माळी हा गंभीर जखमी होवुन बेशुद्ध झाला. तसाच बेशुद्ध अवस्थेत मुकादम व त्यांच्या साथीदाराने त्याला करंजी घाटात आणुन टाकले. वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला आहे.
गुन्हा अंभोरा (ता. आष्टी) हद्दीत घडला असल्याने या खुनाचा गुन्हा अंभोरा पोलिस स्टेशनला दाखल झाला. मात्र प्रेत पाथर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टाकल्याची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे पीआय सुहास चव्हाण, एपीआय कायदे, पोलिस.हे.काॅ. अरविंद चव्हाण, पो.काॅ. सतिष खोमणे, पो. काॅ.यांनी तातडीने घटनास्थळी येवुन मयत संजय माळी याचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी पाठवुन देण्यासाठी अंभोरा पोलिसांना मदत केली. यावेळी अंभोरा पोलिस स्टेशनचे पोलिसही हजर होते.
Tags :
149
10