महाराष्ट्र
ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव, तर शिंदे गट आता 'बाळासाहेबांची शिवसेना'
By Admin
ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव, तर शिंदे गट आता 'बाळासाहेबांची शिवसेना'
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उद्धव ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती.
तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने हे देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.
शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हं द्यायचे निर्देश
शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे.
पहिल्याच राजकीय डावपेचामध्ये उद्धव ठाकरे जिंकल्याचं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना या तिन्ही नावांचा समावेश आहे असंही ते म्हणाले.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांनी आपल्या चिन्हांचा आणि नावाचा पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी पक्षांच्या तीन नावाची आणि तीन चिन्हांच्या पर्यायाची नावं दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला.
Tags :
4906
10