विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा मृत्यू; परिसरात हळहळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ रोडवर कांबळे वस्तीनजीक शनिवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान शेतामध्ये काम करत असलेले जालिंदर एकनाथ कांबळे (वय 30) व त्यांची पत्नी नीता जालिंदर कांबळे (वय 27) यांचा लाईटच्या तारांना चिकटून अपघाती मृत्यू झाला.
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ रोडवर कांबळे वस्तीनजीक शनिवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान शेतामध्ये काम करत असलेले जालिंदर एकनाथ कांबळे (वय 30) व त्यांची पत्नी नीता जालिंदर कांबळे (वय 27) यांचा लाईटच्या तारांना चिकटून अपघाती मृत्यू झाला.
शनिवारी दोघेही नवरा-बायको आपल्या शेतामध्ये पिकामधील गवत यंत्राच्या सहाय्याने काढायचे काम करत होते. तेथेच पसरलेल्या शेजारील विजेच्या केबलला गवत काढण्याच्या यंत्राच्या पात्याने विद्युत प्रवाह चालू असलेल्या केबलला कापले व ते नंतर त्या मशीनला गुंडाळले गेले. त्यामुळे जालिंदर कांबळे हे जागीच मृत्यू पावले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या पत्नी नीता कांबळे धावून आले असता त्यांचाही तिथे विजेला चिकटून जागीच मृत्यू झाला.
त्यांना छोटीशी मुलगी असल्याचे समजते. घटना घडल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर होऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.