महाराष्ट्र
श्री तिलोक जैन विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By Admin
श्री तिलोक जैन विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेच्या इयत्ता बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा सालाबाद प्रमाणे कायम राखली आहे.
यावेळी या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे होते.
विद्यालयाचा इयता १२ वी चा निकाल शेकडा ९९.३४ लागला असून लांबदाडे जयेश सूर्यकांत याने ९०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला, कु.पलक सचिन गांधी हिने ८७.५०% गुण मिळवून दुसरा क्रमांक तर कु. दराडे पूजा गणेश हिने ८६.१७ % मिळवून तिसरा क्रमांक मिळवीला.
सत्कार प्रसंगी सचिव सतिश गुगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना कोरोना काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास करून ऑफलाईन परीक्षा दिल्या, अभ्यासक्रम ऑनलाइन झाला अशा असामान्य परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे, असे विचार व्यक्त केले.
कु. पलक गांधी हिने मनोगत व्यक्त करतांना विद्यालयाने आम्हाला कोरोनाच्या काळात दर्जेदार शिक्षण तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामूळे पदाधिकारी ,प्राचार्य आणि अध्यापक वर्गाचे आभार मानले. ऑनलाइन शाळा असतांना सुध्दा शिक्षकांनी गुगलमिट , टीचमिंट यांच्या मदतीने सर्व अभ्यासक्रम शिकविला, त्यामुळे आमच्यात परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण झाला. या प्रसंगी चांगले गुण मिळवलेले साईराज दौंड आणि शिवाणी शिरसाठ यांचाही सत्कार करण्यात आला.
या समारंभासाठी खजिनदार सुरेशलाल कुचेरीया ,विश्वस्त धरमचंदजी गुगळे, डॉ. ललीत गुगळे ,राजेंद्र मुथ्था ,कार्यकारी मंडळ सदस्य संपतलाल गांधी ,डॉ. सचिन गांधी ,प्राचार्य अशोक दौंड ,पर्यवेक्षक विजयकुमार घोडके , दिलावर फकीर,विभाग प्रमुख सुधाकर सातपुते, कार्यालय प्रमुख महेंद्रकुमार राजगूरू, उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.जब्बारखान पठाण यांनी केले.सूत्रसंचलन प्रा. प्रकाश लवांडे तर आभार विभाग प्रमुख सुधाकर सातपुते यांनी मानले.
Tags :
30085
10