महाराष्ट्र
बँक खात्यात वेतन जमा करण्यासाठी 3000 रुपयांची लाच स्विकारणारी महिला लिपिक एसीबीच्या जाळ्यात
By Admin
बँक खात्यात वेतन जमा करण्यासाठी 3000 रुपयांची लाच स्विकारणारी महिला लिपिक एसीबीच्या जाळ्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तक्रारदार- पुरुष वय- २९, रा- घुलेवाडी,ता- संगमनेर जि.अहमदनगर
आरोपी =१) सुनिल पोपट पर्बत, वय ४०, धंदा - नौकरी, व्यवस्थापक, प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी, संगमनेर.
. निंबाळे, ता. संगमनेर ,जि.अहमदनगर.
२) सुजाता तेजेश कांबळे, वय- ३३ धंदा- नौकरी, लिपिक, प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी, संगमनेर,
रा- छगन पगारे यांचे घरी भाड्याने,मालदाड रोड, संगमनेर, ता. संगमनेर, जि.अहमदनगर.
लाचेची मागणी- ३०००/-₹
लाच स्विकारली ३०००/ ₹
हस्तगत रक्कम- ३०००/-रु
लाचेची मागणी - ता.२०/०७/२०२२
लाच स्विकारली -ता. २०/०७/२०२२
लाचेचे कारण -.तक्रारदार हे प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी संगमनेर यांचे कडे नेमणुकीस असुन, त्यांनां सदर कंपनी कडून उप अभियंता, म.रा.वि.वितरण कंपनी, संगमनेर (शहर) विभागात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून सप्टेंबर २०१८ पासून नेमण्यात आलेले आहे. प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी ही शासनाकडे नोंदणीकृत कंपनी आहे.
तक्रारदार यांचे म.रा.वि.वि. कंपनी कडून प्रत्येक महिन्याचे वेतन प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी कडे वर्ग केले जाते. प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी मधील वर नमुद आरोपी हे तक्रारदार यांचे जून महिन्याचे वेतन त्यांचे बॅंक खात्यामध्ये जमा करणे साठी ₹ ३०००/- ची मागणी करत असले बाबतची तक्रार तक्रारदार यांनी ला प्र.विभाग अहमदनगर यांचेकडे दिली. त्यांचे तक्रारीचे अनुषंगाने आज रोजी लाच मागणी पडताळणी केली असता वर नमूद दोन्ही आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे जून महिन्याचे वेतन बॅंक खात्यामध्ये जमा करण्यासाठी पंचासमक्ष ₹ ३०००/- ची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आज रोजी प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी कार्यालयात लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी नं २ यांनी तक्रारदार यांचे कडुन पंचासमक्ष ₹ ३००० /- लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच आरोपी क्रमांक १ यांना सुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे.
संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची की कार्यवाही सुरू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी:- हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर.
सापळा पथक:- पोलीस निरीक्षक शरद गोर्डे. पो अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पो ह. हरुन शेख,
*मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
मा:- सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी: प्रोपायटर, प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी, संगमनेर, जि- अहमदनगर .
Tags :
247
10