महाराष्ट्र
21-Dec-2024
अपहरण करणारे २४ तासांच्या आत जेरबंद
शेवगाव - नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बाडगव्हाण येथील अपहरण करण्यात आलेल्या आप्पासाहेब भानुदास काजळे यांची २४ तासात सुटका करत पोलिसांनी एकजण जेरबंद केला. ही कारवाई शेवगाव पोलिसांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी शेवगाव तालुक्यातील मनिषा आप्पासाहेब काजळे (वय-४५ वर्षे धंदा-शेती रा. बाडगव्हाण शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) यांनी दि. १८ डिसेंबर रोजी त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे (वय ५४ वर्षे रा. बाडगव्हाण ता. शेवगाव) यांना दोन ते तीन इसमांनी बोधेगाव येथुन बळजबरीने वाहनात टाकुन पळवुन नेले असल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तीन पोलीस
पथके तयार करुन सांगली, बीड व पैठण हद्दीत रवाना केली होती. अपहृत व्यक्तीचा शोध घेत असतांना तांत्रिक तपासाच्या सहाय्याने बीड येथे गेलेल्या तपास पथकाला शिरुर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबुन ठेवले असल्याची माहिती मिळाली. यानुसार पथकाने छापा टाकून अपहृत व्यक्तीसाह एका आरोपीस ताब्यात घेत त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोमनाथ बाबुश्या जाधव (रा. औरंगपुर ता.शिरुर कासार जि. बीड) असल्याचे सांगितले. त्याचे इतर साथीदार मात्र अद्याप पसार
आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, पोसई. प्रविण महाले, पोहेकाँ. चंद्रकांत कुसारे, पोहेकाँ. आदिनाथ खेडकर, पोना. ईश्वर गर्जे, पोना. संदिप आव्हाड, पोकाँ. शाम गुंजाळ, पोकॉ. संतोष वाघ, पोकॉ. राहुल खेडकर, पोकॉ. फलके, पोकॉ. प्रशांत आंधळे, पोकॉ. देविदास तांदळे, पोकाँ. एकनाथ गरकळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ. राहुल गुंडु यांनी केली.